लग्न होत नसल्याने गवाळीच्या तरुणाची आत्महत्या
खानापूर : लग्न होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून गवाळी येथील तरुणाने जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
मंगळवार दि. 11 जून पासून संदीप नारायण गावकर (28) हा तो बेपत्ता झाला होता. खानापूर पोलीस ठाण्यात गुरुवार दि. 13 रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
त्याचा शोध घेतला असता गावापासून तीन किलोमीटर अंतरावर जंगलातील वाटेवर त्याची दुचाकी व हेल्मेट पडलेले आढळून आले. पुढे त्याचा तपास घेतला असता जवळच्या जंगलात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.
संदीप हा इस्लामपूर येथे गवंडी काम करत होता आणि वारकरी होता. तो गावातील सर्व धार्मिक कार्यक्रमात कायम भाग घेत होता. पण लग्न जमत नसल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केली.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
पश्चिम भागातील सर्व धबधबे फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून बंद करन्यात आले आहे।मान,चिखले,पारवाड़,चोरला,सुर्ला हे सर्व धबधबे बन्द करण्यात आले आहेत।तरी पण बेलगाव व इतर भागातील लोक भरपूर प्रमाणात शनिवार व रविवारी सुट्टी आहे म्हणून फिरायला यायलेत व रोड ला नको तेवडी गर्दी,दंगा चालु आहे ह्या अशा गैर वर्तुनिकी मुळे एक्सीडेंट होण्याचा शक्यता फार आहेत।।तरी जरा हि बातमी आपण ग्रुप वर घालवी की।हे सर्व धबधबे बंद करण्यात आले आहेत 50 की.मी प्रवास करून येतात लोक पण धबधबे बंद अकल्याणकारनाने निराश होउन परत जाव लागतय।।