क्राईम
गर्लगुंजी माऊली मंदिरातील दानपेटी फोडून चोरी
गर्लगुंजी : गर्लगुंजी गावच्या बाहेर असलेल्या ग्रामदेवता माऊली मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम लांबवल्याचा प्रकार रविवारी (दि. 8) सकाळी उघडकीस आली. मात्र, रविवारी रात्री उशीरापर्यंत खानापूर पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली नव्हती. मंदिर गावच्या बाहेर आहे.

शनिवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गावातील लोक मंदिर परिसरात फिरकले नाहीत. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीला खालून भोक पाडून रोख रक्कम लांबविल्याची घटना घडली. रविवारी सकाळी हा प्रकार गर्लगुंजी : चोरट्यांनी फोडलेली निदर्शनास आला. रात्री उशीरापर्यंत दानपेटी.
या घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली नव्हती. यापूर्वी देखील मंदिरातील घंटा व समई, दागिण्यांची चोरी झाली होती.