पंढरपूरसाठी विशेष रेल्वे : कागेरी यांच्या विनंतीला केंद्रीय मंत्र्यांचा प्रतिसाद
नवीदिल्ली: आषाढी वारी निमित वारकरी संप्रदायाकडून पंढरपुरला जाण्यासाठी भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन यशवंतपूर – पंढरपूर एक्स्प्रेस ( ट्रेन नंबर 16541) सुरू करण्यात आली आहे.
उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आठवड्यातून एकदा ऐवजी 25 जून ते 30 जुलै या कालावधीत ही रेल्वे सेवा सुरू करावी, अशी विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
विश्वेश्वर हेगडे कागेरी Vishweshwar Hegde Kageri यांनी नवी दिल्लीत मंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. 25 जून ते 30 जुलै या कालावधीत दररोज ही गाडी धावल्यास मोठ्या प्रमाणात भाविकांना याचा फायदा होईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या मागणीचा विचार करून यशवंतपूर एक्स्प्रेस दररोज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली.
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या प्रकरणाची तातडीने दखल घेतली जाईल आणि दररोज रेल्वे सुरु केली जाईल असे सांगितले. हीच गाडी दररोज सुरु करता येत नसेल तर विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात येईल असे मंत्र्यांनी सांगतिले. मंत्र्यांच्या या आश्वासनाचा भक्तांना फायदा होणार आहे.
हुबळी ते पंढरपूर या रेल्वेसेवेच्या प्रश्नावर खानापूर वारकरी संप्रदायाच्या वतीने रमेश एस. नार्वेकर आणि खानापूर वारकरी सोसायटीचे चेअरमन ह.भ.प. शांताराम गंगाराम हेब्बाळकर यांनी कागेरी यांना निवेदन दिले होते.
या संदर्भात कागेरी यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात विनंती करून रेल्वेची गरज सांगितली. विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद दिल्याबद्दल मंत्र्यांचे आभार मानले.
Special train for Pandharpur: Union minister’s response to Kageri’s request
belgaum to pandharpur train
belgavi to pandharpur train
belgaum to pandharpur train today
belgaum to pandharpur train ticket price
🧑🏻💻बातम्यांसाठी ग्रुप नक्की जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GcqDaAQR1nRItesBrMuvIX
बातमी पाठवा 💬8088101547
बेळगांव एक्सप्लोर करा