खानापूर: शनाया गार्डन जवळ अपघात, 1 ठार तर 1 जखमी
खानापूर: शुभम गार्डन येथे लग्नाला जाणाऱ्या 2 तरुणांच्या गाडीला खानापूर हून जांबोटी दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकी अॅक्टिव्हा स्कूटरला धडक दिल्याने 1 तरुणाचा मृत्यू तर दुसरा तरुण जखमी झाल्याची घटना नुकताच शनाया गार्डन समोर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवठाण खानापूर येथील दोन तरुण शुभम गार्डन येथे अॅक्टिव्हा गाडी ( KA 22 EW 1352) वरून लग्नासाठी जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने 1 तरुण नाव कु. विधेश तुकाराम मिराशी (वय 25) याचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. तर दुसऱ्या तरुण हा किरकोळ जखमी झाला आहे. सदर ट्रक चालक धडक देऊन ट्रक न थांबवता पळून गेला आहे. अॅक्टिव्हा गाडी रोडच्या विरुद्ध दिशेला पडली असून अपघात कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत.
सध्या लग्नाचे शिजण चालू असल्याने जांबोटी रोडवर जास्त गर्दी असते आणि अश्यातच हा रोड चांगल्या स्थितीत असल्याने लोक नेहमीच या रोडने गाड्या वेगाने चालवतात. या मुळे या रोडवर नेहमी लहान मोठे अपघात होत असतात. पण आज घडलेल्या या अपघाताने गाड्या किती वेगाने चालवाव्या याचा विचार करावा लागेल.
सदर घटना स्थळी खानापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.