क्राईम

लोंढा येथे धावत्या रेल्वेतून पडून अस्तुली येथील युवकाचा पाय निकामी

रामनगर : खानापूर तालुक्यातील अस्तुली या गावातील तिमंना महादेव मिराशी (वय 34) हा युवक पंढरपूर येथे कामाला जाण्यासाठी निघाला होता. लोंढा रेल्वेस्थानकात येऊन हरिप्रिया एक्स्प्रेस समजून गोव्याला जाणाऱ्या हावडा एक्स्प्रेसमध्ये चढला. काही अंतरावर ट्रेन गेल्यानंतर चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्याचे समजल्याने धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या
प्रयत्नात पडल्याने त्याचा एक पाय निकामी झाला आहे.


त्याला प्रथम लोंढा येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

accident in londa khanapur

Khanapur news today, Khanapur newspaper today

source: tb

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते