खानापूर

खानापूर निंगापूर गल्लीमध्ये उद्या श्री चव्हाटा देवस्थानचा वार्षिक यात्रा उत्सव

खानापूर: सालाबादप्रमाणे यंदाही श्री चव्हाटा देवस्थानचा वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. गुरुवार, २० मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता विधीपूर्वक पूजा होऊन यात्रेस सुरुवात होईल.

खानापूर निंगापुर गल्लीतील चव्हाटा देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शिमग्याच्या सनातील या यात्रेदिवशी हजारो भाविक देवाचे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. दुपारनंतर यात्रेला सुरूवात होते आणि रात्री ११ वाजेपर्यंत भक्तगण नवस बोलण्यासाठी आणि पूर्ण झालेल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी हजेरी लावतात. त्यामुळे या यात्रेला दरवर्षी मोठी गर्दी पाहायला मिळते.

रात्री 11 वाजता शेवटच्या पूजेनंतर धार्मिक विधी पार पडून यात्रेची सांगता होते. स्थानिक नागरिक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री चव्हाटा देवस्थान, निंगापूर गल्ली मंदिर समितीने केले आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते