खानापूर

स्थलांतराबाबत आज सर्व पक्षीय बैठक

खानापूर:  खानापूर तालुक्यातील अती दुर्गम भागात भीमगड अभयारण्यात राहणाऱ्या खानापूर तालुक्यातील 13 गावांच्या ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यासंदर्भात आज 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक खानापूर येथे आमदारांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

अभयारण्यात राहणाऱ्या नागरिकांना रस्ते, पाणी, वीज आणि इतर मुलभूत सुविधा पुरविता येत नाहीत. त्यामूळे राज्यसरकारने त्यांचे स्थलांतर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या 13 गावातील नागरिकांनी स्वेच्छेने स्थलांतर करण्यास सहमती दर्शविल्यास त्यांचे स्थलांतर जागा आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य निर्णय सर्वानुमते घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केले आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते