खानापूर

खानापूर हायटेक बस स्टॅंड चे उदघाटन 12 तारखेला

खानापूच्या विकासासाठी माजी आमदार डॉ अंजलीताई कटिबद्ध : महादेव कोळी

खानापूर: तालुक्यातील मागील एक वर्षाचा विकास पाहून खानापूर तालुका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणाले. आम्ही कॉंग्रेस पक्ष म्हणून तालुक्याच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचे चुकीचे राजकारण करणार नसून सतत तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.

मागील वर्ष भरात एकही नवीन काम रस्ता पूल इमारत तालुक्यासाठी मंजूर करून आणली नाही. इतरांसारखे घाणेरडे राजकारण कॉंग्रेस पक्ष कधीही करतं नाही, आम्ही नेहमी सत्याच्या बाजूनेच … आहोत असे महादेव कोळी म्हणाले.

बीजेपी सरकार असतांना व ताई आमदार असतांना अनेक गोष्टींना बीजेपीच्या नेत्यांनी विरोध केला आडकाठी आणली …
मग ते खानापूर चे बस स्टॅंड असो अथवा जांबोटी – आमटे ची मुलींच्या शाळेचा उदघाटन कार्यक्रम असो बीजेपी नी खालच्या दर्जाचे राजकारण केले.

आता राज्यात कॉंग्रेस सरकार आहे आम्ही खानापूरच्या विकासांसाठी सकारात्मक असून प्रयत्नशील पण आहोत….

खानापूर हायटेक बस स्टॅंड चे उदघाटन 12 तारखेला

ताईंनी मंजूर केलेल्या व भूमीपूजन केलेल्या, खानापूर हायटेक बस स्टॅंड चे उदघाटन येत्या 12 तारखेला राज्याचे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी साहेब व डिस्ट्रीक्ट मिनिस्टर आपले नेते सतीश आण्णा जारकाहोळी यांचे उपस्थितीत होणार असल्याचे निश्चित झाल्याचे कळविले आहे. ताईंसकट आम्हा सर्व कॉंग्रेस जणांना सार्थ अभिमान आहे अतिशय जुने गळके खराब असलेल्या खानापूरच्या बसस्थानकाचा आमच्या नेत्या ताईंनी कायापालट केला … व आता हे बस स्टॅंड खानापूरकरांच्या सेवेत दाखल होत आहे…
दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे ताई आमदार असतांना शेवटच्या सहा महिन्यात खानापूरच्या जनरल हॉस्पीटल साठी 100 बेडची नवीन इमारत उभारण्यासाठी 31.50 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. मागच्याच आठवड्यात राज्याचे आरोग्य मंत्री सन्माननीय दिनेश गुंडू राव यांची ताईंनी भेट घेतली. त्यावेळी ताईंनी 100 बेड च्या जनरल हॉस्पीटल संदर्भात आठवण करून दिली होती आणि कालच कॅबीनेट मधे खानापूरच्या 100 बेडच्या जनरल हॉस्पीटल साठीचे ॲडमीन आप्रूव्हल झाले … आता लवकरच हे काम सुद्धा सुरू होईल असे महादेव कोळी म्हणाले.

ताई नेहमीच खानापूरच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत… आणि सरकार दरबारी कामे करून घेण्यास पण सक्षम आहेत.

मागच्याच आठवड्यात आम्ही सर्वानी सन्माननीय सतीश आण्णांची भेट घेऊन खानापूर लिंगनमठ रोड चकाचक करण्यासाठी निवेदन दिले असून पीडब्लूडी मंत्री लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील असेही महादेव कोळी म्हणाले …

ते पुढे म्हणाले आम्ही कुठेही विकास कामात बीजेपी सारखी आडकाठी आणणार नाही आणि आणली सुद्धा नाही… जनतेच्या न्याय हक्कांसाठी आम्ही कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पुढेही लढत राहू …..तालुक्यात जी आत्ता कामे सुरू आहेत किंवा उद्घाटने होत आहेत, अथवा पुढेही वर्षभर उद्घाटने होत रहातील ही सर्व कामे ताईंनी मंजूर करून आणली आहेत…

गेल्यावर्ष भरात एकही नवीन काम रस्ता पूल इमारत तालुक्यासाठी मंजूर करून आणली नाही … ही भूषणावह गोष्ट नाही…
यासंदर्भात सुद्धा इथून पुढे ताई विकासाची कामे मंजूर करून आणतील यात शंका नाही….

Inauguration of Khanapur Hi-Tech Bus Stand on 12th

khanapur new busstand

Ex MLA anjali nimbalkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते