खानापूर
पोरांनो.. अजून दोन दिवस सुट्टी सोमवार, मंगळवार सुट्टी जाहीर
बेळगाव : पश्चिम घाट आणि खानापूर भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपायुक्त मोहम्मद रोशन यांनी खानापूर आणि बेळगाव तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श् वभूमीवर उपायुक्त मोहम्मद रोशन यांनी खानापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक, हायस्कूल आणि पीयू कॉलेजांना 22 ते 23 जुलै दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे.
