खानापूर

मंदिरातील मूर्तीची नासधूस

हुबळी : येथील दत्तात्रेय मंदिरात मूर्ती फोडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याबाबत संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.

हुबळी देशपांडे नगर येथील अपर्णा अपार्टमेंटमध्ये 15 वर्षांपूर्वी दत्तात्रेयाचे मंदिर बांधून दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. दररोज पूजाही करण्यात येत होती.   रात्री दोन वाजेपर्यंत सर्वांनी मिळून नवरात्रोत्सव साजरा केला. पण दुसरे दिवशी मंदिराचे पुजारी आले असता हा गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे.

संबंधित संशयितांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे. हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठीच हा प्रकार केला आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याने असे घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. समाजातील शांतता बिघडवण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप होत आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते