खानापूर

बापरे.. लोंढा येथे भर पुलावरून मुलांना खांद्यावर बसवून शाळेत पाठवणाऱ्या पालकांचे त्रास

लोंढा: मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत.

सातनाळी , माचाळी मंजरपई रोडवरील हा पूल
दर वर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो. पण या समस्येचे ऐकून घेणारे कोणीच नाही. दरवेळी पावसाळ्यात इथले लोक अनेक समस्यांचा सामना करतात.

लोंढा भागातील पांढरी नदीसह परिसरातील नाल्यांना पाण्याचा पूर आला आहे.  सातणाळी माचाळी या जंगल पट्ट्यात असलेल्या गावांना तिन्ही बाजूंनी असलेल्या नाल्यावर पूलाचा वेढा निर्माण झाल्याने या गावाला बेटाचे स्वरूप आले आहे.

आता चाचणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे आवश्यक आहे. त्यामुळे पुलावरून विद्यार्थ्यांना खांद्यावर उचलून शाळेत पाठवण्यासाठी पालकांची धडपड सुरू आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला नेण्यासाठी पालक आपला आणि मुलांचा जीव धोक्यात घालून पाण्यातून पुल ओलांडत आहेत.

आपत्ती येण्यापूर्वी संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी जागे होऊन अशा पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे किंवा पुलाची उंची वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते