बातम्या

गोव्यात राहणाऱ्या खानापूरच्या टॅक्सी चालकांचे त्रास: आमदार विठ्ठल हलगेकरांची भेट


खानापूर: गोव्यात काम करणाऱ्या कर्नाटकातील चालकांना गोवा पोलीस त्रास देत असल्याने गोवा राज्यात काम करणाऱ्या खानापूर बेळगावच्या टॅक्सी  चालकांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

खानापूर बेळगाव च्या ड्रायव्हरांना कर्नाटकचे लायसन्स असल्याने गोवा पोलीस गाडीचे कागदपत्र व्यवस्थित असले तरी फक्त लायसन्स कर्नाटक KA असल्याने 10 हजार रुपये दंड भरायला सांगत असल्याने आज 70 ते 80 चालकांकडून आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. 

यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कॉल करून याची माहिती दिली. याचबरोबर  स्वतः गोवा येथे येऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल करून देतो असे  सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते