जांबोटी-वडगांव गावात शिरला बिबट्या, कुत्र्यांची शिकार घटना सीसीटीत कॅमेऱ्यात कैद
खानापूर: वडगांव-जांबोटी येथे काल रात्री बिबट्या वाघाने गावातील दोन कुत्र्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
सर्वप्रथम या बिबट्याने गावामधील मोठ्या हायमास्ट लाईट खाली जयसिंग महादेव पाटील यांच्या कुत्र्याला आपल्या जबड्यात घेतले पण मोटरसायकलच्या जवळ कुत्रे आल्यामुळे मोटर सायकल खाली पडून कुत्र्याला जीवदान मिळाले. यानंतर या बिबट्याने गावभर सर्व कुत्र्यांची तलाशी घेत शेवटी श्रीकांत देसाई यांच्या घरासमोर कुत्र्यावर हल्ला चढवला पण कुत्र्याने आरडा ओरड करताच झोपलेले मालक लगेच जागे झाले. लाईट बिबट्यावर पडताच बिबट्या तिथून पसार झाला.
या घटनेचा व्हिडिओ जांबोटी ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मागिल वर्षभरात जवळपास परिसरातील चार ते पाच कुत्री याच बिबट्याने खाल्ली असावीत असा गावामध्ये तर्क वितर्क वर्तविला जात आहे.

leapord in Jamboti vadgav
leapord caught in cctv camera