बिर्याणी मुळे वाद: बेळगावात दोघांना अटक
बेळगाव : मुलाच्या वाढदिवसानिमित्त 200 जणांसाठी मागवलेली बिर्याणी वेळेवर न पोहोचल्याने गांधी नगरमध्ये हाणामारी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, यमनापूर येथील सचिन दड्डी नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. त्यांनी गांधी नगर येथील सलीम नदाफ यांच्याकडे 200 जणांसाठी बिर्याणीची ऑर्डर दिली होती.
रात्री 8 वाजेपर्यंत बिर्याणी देतो असे सांगितल्याने सचिन दड्डी याने त्याचे दोन मित्र अमृत गस्ती आणि बलराज हलबल यांना गांधीनगर येथे पाठवले. मात्र 11 वाजेपर्यंत बिर्याणी दिली नाही. त्यावेळी वादावादी होऊन हाणामारी झाली, यात मुश्ताक सय्यद व अफजल सय्यद हे दोघे जखमी झाले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हाणामारीप्रकरणी मालमारुती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
fight due to Biryani : Two arrested in Belgaum
Police case in belgavi, 2 arrested in belgavi