क्राईम

अल्पवयीन मुलीबरोबर विवाह पतीची हिंडलगा जेलमध्ये रवानगी


अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चिकोडी तालुक्यातील फरार पतीला खडकलाट पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, गुरुवारी त्याला बेळगावच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा जेलमध्ये केल्याची माहिती सीपीआय बी. एस. तळवार यांनी  दिली.

ही घटना मंगळवारी उपडकीस आली होती. गोकाक तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी अटकेतील व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी मेंढपाळ व्यवसायाच्या माध्यमातून ओळख करून विवाह केला होता. त्यानंतर ती गर्भवती राहिल्याने निपाणी सीडीपीओ कार्यालयातर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी त्याच्यावर बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते