खानापूर : खानापूर तालुक्यातील कक्केरी येथील सैनिक मंजुनाथ अंबादगट्टी (वय ३५) यांचे मंगळवारी निधन झाले असून त्यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला.
गेल्या 16 वर्षांपासून मंजुनाथ हे भारतीय लष्कराच्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. गेल्या शुक्रवारी एका अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
त्यांना दिल्लीतील मिलिटरी बीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचाराचा उपयोग झाला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. मंजुनाथचा मृतदेह मूळ गावी आणण्यात आला असून कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.