खानापूर

खानापूरमध्ये हत्ती ; मनसापूर कडे हत्तीची कूच

खानापूर : आज सकाळी खानापूर शहरातील मयेकर नगर परिसर आणि रेल्वे स्टेशनजवळ हत्ती दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळच्या सुमारास नागरिकांना रस्त्यालगत हत्ती फिरताना दिसला, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्ती प्रथम मयेकर नगर आणि रेल्वे स्टेशन परिसरात दिसून आला. त्यानंतर तो मनसापूर दिशेने जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. हत्तीचा वावर लक्षात येताच अनेकांनी सुरक्षित अंतर ठेवत त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढले.

घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, हत्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, शहराजवळ अचानक हत्ती दिसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभाग हत्तीला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने वळविण्याचे प्रयत्न करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या