खानापूर

खानापूर आणि गोवा परिसरात विश्वभरती कला क्रीडा संघटनेचे उल्लेखनीय योगदान

गोवा, केपे: मराठा मंडळ ग्रुप, गुडी परोडा, केपे, गोवा यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त रविवार, 30 मार्च 2025 रोजी आठवी सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. यावर्षीचे महापूजांचे मानकरी श्री. गंगाधर रावजी पाटील होते. या कार्यक्रमात खानापुर बेळगांव येथील अनेक भक्तगणांनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहून धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला. या प्रसंगी खानापूर विश्वभरती कला क्रीडा संघटना संस्थापक अध्यक्ष आणि माजी सैनिक श्री. अनिल देसाई यांनी आपल्या उद्दिष्टांची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विश्वभरती कला क्रीडा संघटनेचे मार्गदर्शन – महिलांच्या सक्षमीकरणावर भर

कार्यक्रमाच्या प्रसंगी विश्वभरती कला क्रीडा संघटना संस्थापक अध्यक्ष, माजी सैनिक श्री. अनिल देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या उद्दिष्टांची माहिती देत सांगितले की, विद्यार्थ्यांनी मातृभाषेत शिक्षण घ्यावे आणि आपल्या शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग व व्यायामाची सवय लावावी. तसेच महिलांनी संघटित होऊन विविध क्षेत्रांत आपले योगदान द्यावे.

महिला सशक्तीकरणाची गरज – 50 ते 55 टक्के सहभागासाठी प्रयत्न आवश्यक

स्त्रिया ईश्वरी शक्तीचा अविष्कार असून त्यांचा सन्मान केला पाहिजे. महिलांनी एकत्र येऊन कार्य केल्यास समाजात मोठे परिवर्तन घडू शकते. सरकारने महिलांना 50 ते 55 टक्के आरक्षण नोकरी, व्यवसाय, राजकारण आणि विविध क्षेत्रांत दिले आहे. या सवलतींचा महिलांनी फायदा घ्यावा आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

दुर्गम भागाचा विकास – शिक्षण आणि खेळामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती आवश्यक

कार्यक्रमात अनिल देसाई यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण व खेळात प्रगती करावी आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधावा, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असा संदेश दिला. जिद्द, चिकाटी आणि कष्ट घेतल्यास माणूस कुठेही यशस्वी होऊ शकतो. त्यांनी विश्वभरती कला क्रीडा संघटना ही संस्था दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि खेळाच्या माध्यमातून प्रेरित करत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात मान्यवरांचा गौरव – मराठा मंडळ ग्रुपचे अभिनंदन

या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने मराठा मंडळ ग्रुपने सर्व मान्यवरांचा मानसन्मान केला. मराठा मंडळ ग्रुपचे अध्यक्ष श्रीमान महेश नाईक आणि इतर मान्यवरांचे स्वागत करून त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अनिल देसाई यांनी मंडळाचे आभार मानले.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास बेळगाव, खानापूर आणि गोवा येथील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये श्रीमान महेश नाईक, मारुती पाटील, महेश मिराशी, रोहित रेडेकर, शंकर वीर, मारुती वीर, अर्जुन गुरव, गोपाळ मिराशी, बळीराम बिदरभावी, मारुती शिरोडकर, चंद्रकांत करमळकर, टोपांना मिराशी, मोहन मिराशी, अनिल मिराशी, ज्योतिबा पाटील, दयानंद मुदगेकर, संदीप बिदरभावी आदी मान्यवरांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते