खानापूर

शौर्याचा सन्मान: वडगांवमध्ये शहीद धोंडीबा देसाईंच्या स्मृतीसाठी स्वागत कमान

खानापूर: वर्ष 1999 मध्ये कारगिल युद्धात शहीद झालेले आणि कर्नाटकातील एकमेव वीर जवान म्हणून ओळख असलेले वडगांव (जांबोटी) येथील शहीद धोंडीबा देसाई यांच्या स्मरणार्थ गावात एक सुसज्ज स्वागत कमान (प्रवेशद्वार) उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन उद्या, रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. या वेळी स्वागत कमानीच्या कॉलमभरणीचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांच्या विशेष आग्रहास्तव आ. विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, माजी जि.पं. सदस्य जयराम देसाई, जि.प. सदस्य बाबुराव देसाई, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेत्या सोनाली सरनोबत, आबासाहेब दळवी, जांबोटी सोसायटीचे अध्यक्ष विलास बेळगांवकर, धनश्री सरदेसाई आणि प्रभाकर देसाई हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त भारतीय जवान बळवंत इंगळे हे राहणार आहेत. तसेच प्रमुख वक्ते म्हणून माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल आणि ओलमनी शाहू हायस्कूलचे सहशिक्षक अजित सावंत यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात शहीद धोंडीबा देसाई यांच्या आई-वडिलांचा गावकऱ्यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय रवींद्र कळेकर यांच्या हस्ते पावती पुस्तकाचे प्रकाशन होईल.

स्वागताध्यक्ष म्हणून जांबोटी पंचायतीचे उपाध्यक्ष सुनिल देसाई आणि शिक्षक कुशकुमार देसाई हे भूमिका बजावतील, तर किणये सरस्वती हायस्कूलचे सहशिक्षक मुकुंद देसाई हे कार्यक्रमात येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत करतील.

गावकऱ्यांच्या एकात्म आणि देशभक्तीच्या भावनेतून उभा राहणारा हा उपक्रम संपूर्ण वडगांवसाठी अभिमानास्पद ठरणार आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते