खानापूर
अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा लढा: नगरपंचायत सदस्याचे अपहरण
कित्तूर: कित्तूर नगरपंचायतीच्या सदस्याचे रात्री अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कित्तूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक 3 सप्टेंबर रोजी होणार असून एकूण 20 सदस्यांपैकी 10 सदस्यांना भाजप, तर 10 सदस्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे.
शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील चौकीमठ क्रॉसजवळ उभे असताना कित्तूर नगरपंचायतीचे भाजप सदस्य नागेश असुंदी यांचे अपहरण करण्यात आले.
अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुलेद यांनी दिली. भाजप सदस्याच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.
कित्तूर पोलिस ठाण्याचे पीएसआय प्रवीण गांगोल व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाजवळील चौकीमठ क्रॉस स्पॉटची पाहणी केली.
