खानापूर

खानापूर रेल्वे स्थानकावर आठवीच्या मुलाचे अपहरण, घडले काही असे..

खानापूर: खानापूर रेल्वेस्थानक परिसरात राहणाऱ्या आदित्य मिलिंद शिंदे  Aditya Milind shinde या मुलाचे मंगळवार दि. 9 जुलै रोजी मागून काही अज्ञातांनी येऊन रुमालात गुंगीचे औषध वापरून  खानापूर रेल्वेस्थानकावरून अपहरण केले. पण मुलाच्या हुशारीमुळे धारवाड येथे मुलाची सुटका होण्यास मदत झाली.

घडले असे की रेल्वेरूळ पार करून पलीकडे दुकानात जाणाऱ्या मुलाला मागून काही अज्ञातांनी येऊन रुमालात गुंगीचे औषध वापरून तोंडावर धरले. यानंतर सदर मुलाला रेल्वेतील दिव्यांगांच्या डब्यात डांबण्यात आले. पण ते अज्ञात काही वेळानंतर दुसऱ्या डब्यात गेले. त्यानंतर सदर मुलाला रेल्वे धारवाड पर्यंत आल्यानंतर थोडी जाग आली. प्रसंगावधान राखून मुलगा रेल्वेतून उतरून रेल्वेस्थानकावरच झोपी गेला. हे पाहून रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांनी मुलाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मुलाने त्यांना खानापूर असल्याचे सांगितले. झोपेच्या धुंदीतच असणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांचा मोबाईल क्रमांक योग्यपद्धतीने सांगितला. आणि यामाध्यमातूनच पालकांशी संपर्क करून मुलाला धारवाड पोलीस स्थानकाकडे सुपूर्द करण्यात आले.

इकडे मुलाच्या कुटुंबीयांनी रात्री १० वाजले तरीही आपला मुलगा परतला नसल्याचे पाहून शोधाशोध सुरु केली. खानापूर पोलिसांशी संपर्क साधला. याचदरम्यान धारवाड पोलीस स्थानकातून मुलगा सापडल्याचा फोन आला. यावेळी कुटुंबियांना थोडा धीर आला.

खानापूर रेल्वे स्थानकात सीसीटिव्ही कधी

या साऱ्या प्रकारानंतर तातडीने म. ए. समितीचे धनंजय पाटील आणि सहकाऱ्यांनी खानापूर रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. रेल्वेस्थानकावर सीसीटीव्हीची सोय नसल्याने तातडीने सीसीटीव्ही बसविण्याची विनंती रेल्वे अधिकाऱ्यांना करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले, की खानापूर पोलीस स्थानकातर्फे यापूर्वीच सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात सूचना केली आहे.

यानुसार हुबळी विभागाकडे सीसीटीव्ही बसविण्यासाठी खानापूर रेल्वे विभागाने पत्र पाठवून मागणीही केली आहे. अद्याप हि प्रक्रिया पूर्ण झाली नसून लवकरात लवकर सीसीटीव्ही बसविण्यासाठी कारवाई करण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. खानापूर रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती धनंजय पाटील  Dhanajay Patil Khanapur यांनी दिली आहे.

Khanapur News

Khanapur taluka news, Belgaum news

khanapur railway station , belgavi

student kidnap case in Khanapur railway station

news source: Belgaum live

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते