बातम्या

शाळांना अजून दोन दिवस सुट्टी जाहीर, गुरुवार, शुक्रवार सुट्टी

खानापूर: गेल्या आठवडाभरापासून पडणारा मुसळधार पाऊस पाहता बेळगाव शहरासह, बेळगाव तालुका, निपाणी, चिकोडी, कित्तूर, बैंलहोंगल आणि खानापूर तालुक्यातील सर्व शाळांना गुरुवारी (25 जुलै) आणि शुक्रवारी (26 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक, माध्यमिक शाळांचा समावेश असून त्या संबंधीचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला आहे.

जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता ही सुट्टी जारी करण्यात आली आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते