बातम्या
Trending

हुबळी येथे एकतर्फी प्रेमातून नगसेवकाच्या मुलीची हत्या

हुबळी: येथील एका नामांकित कॉलेज मध्ये नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीची एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केली आहे. मृत युवती नेहा हिरेमठ(वय 21) Neha Hiremath व आरोपी युवक फयाज (वय 23) हुबळी येथील एकाच कॉलेज मध्ये शिकत होते.

आरोपी फयाज हा नेहाचा पाठलाग करून तिची हत्या करत असतानाचा प्रसंग सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताचं पोलिसांनी फरार आरोपीला अवघ्या दोन तासात अटक केले. नेहा हिरेमठ हुबळी येथील बी व्ही बी या कॉलेजमध्ये एम सी ए ही पदवी घेत होती.  तर फयाज पहिल्या वर्षात नापास झाल्याने कॉलेजला येत नव्हता.

आरोपी फयाज हा मूळचा बेळगांव जिल्यातील असून तो कॉलेजसाठी आपल्या आई सोबत हुबली येथे राहत होता. वडील हे सरकारी शाळेत शिक्षक आहेत. ते काही महिन्यापासून बायको आणि मुलापासून वेगळे राहत होते.

ही घटना घडल्यानंतर अनेक क्षेत्रातून या खुनाचा निषेध होत असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी होत आहे. अनेक सामजिक संघटना, महिला आणि विध्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने आपला संताप व्यक्त करीत आहेत. आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि महिलांची सुरक्षा वाढवावी याचा नारा देत आहेत.

  • हुबळी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या

सध्या राज्यात निवडणुकीचा प्रचार चालू असल्याने राजकीय पक्ष एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. काहीजण यामध्ये राजकीय हेतू असल्याचे सांगत आहेत तर एकीकडे हा लवजीहादाचा प्रकार असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. अनेक मुस्लिम संघटनांनी देखील या घटनेचा निषेध केला असून आरोपीच्या शिक्षेची मागणी करत आहेत. या घटनेची सध्या सीआयडी चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते