खानापूर

पाठीवर दप्तर, रस्त्यात गुडघाभर चिखल, व्हिडिओ व्हायरल आता तरी घेता का दखल?

खानापूर: स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटून गेली तरी फक्त खानापुर तालुका हा विकासापासून वंचित असल्याचे वारंवार स्पष्ट होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची आज दिवसभर चर्चा आहे.  व्हिडीमध्ये लहान मुले गुडघाभर चिखलातून आपला गणवेश आणि दप्तर सावरत, पायपीट करत शिक्षणाच्या ओढीने शाळेला जाताना दिसत आहेत. 

बीडी कित्तूर रोड वरील केरवाड ग्रामपंचायत क्षेत्रातील हिडकल गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर शेतीवाडीत वसलेले अंजनेय नगर गावातील हे दृश्य. हे गाव आजही मूलभूत सोयी सुविधांपासून कोसो दूर आहे.

या गावाला रस्ता नाही की शाळा नाही. त्यामुळे येथील शेकडो मुलांना चिखलाचा व दुर्गंध युक्त पायवाटेचा आधार घेत हिडकल याठिकाणी शाळेला यावे लागते.

पावसाळ्यात या भागातील मुलांना अक्षरशः जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. या कच्च्या चिखलमय रस्त्यावरून एकूण 12 विद्यार्थी महाविद्यालयात तर 70 विद्यार्थी या कच्च्या रस्त्यावरून प्राथमिक शाळा व हायस्कूलमध्ये जातात.

मात्र या भागाचे लोकप्रतिनिधी मात्र या सर्वाकडे डोळेझाक करत आहेत. आज काल सर्वांना शिक्षण सुविधा पोहचवण्याची भाषा प्रत्येक सरकार करते. मात्र या मुलांची कसरत पाहून राजकारणी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी शाळा कॉलेज ची भाषा करतात असे दिसून येते.

संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या भागातील रस्ते सुधारावेत अशी मागणी ग्रामस्थांसहित विध्यार्थी तसेच सोशल मीडियावर होत आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते