खानापूर
लोंढा-वास्को मार्गावर ट्रेन अपघात,16 डब्बे लोह मार्गावरून घसरले
खानापूर: लोंढा-वास्को लोहमार्गावरील दूध सागर ते सोनवणे च्या मध्ये असणाऱ्या 15 नंबर बोगद्याजवळ वास्को येथून तोरंगळ होस्पेट येथील जिंदाल कंपनीला कोळसा घेऊन जाणारी मालवाहू ट्रेनचे डब्बे येथील लोहमार्गावर घसरल्याने, या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे, तर वास्को येथून तोरंगळच्या दिशेने निघालेली मालवाहू ट्रेन शुक्रवार सकाळी सव्वा नऊच्या, दरम्यान घसरल्याने एक मालवाहू डब्बा पडला असून व इतर 16 डब्बे लोह मार्गावरून सरकले असून लोहमार्ग ही मोडला आहे.

त्यामुळे या मार्गावरून धावणारी गोवा तिरुपती ही ट्रेन रद्द करण्यात आली असून, सायंकाळी जाणारी गोवा एक्सप्रेस ही अन्य ठिकाणाहून वळवणार असल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आली आहे, तर रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आता सदर मार्ग मोकळा करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
