क्राईम

शर्यतीच्या बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू , खानापूर तालुक्यातील घटना

खानापूर:  तालुक्यातील मळव या गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका तलावात बैले धुण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.  गणपती पारशेकर रा. मळव असे शेतकऱ्याचे नाव आहे. गणपती हे आपली बैले धुण्यासाठी जवळच्या तलावात गेले होते. एका बैलाला धुण्यासाठी दुसऱ्या बैलाला दगडाला बांधले होते. अचानकपणे रस्त्यावरील गाडीचा हॉर्न वाजला आणि बैल उधळला व त्याने तलावात उडी मारली आणि त्या दगडासकट तो तलावात बुडाला त्यामूळे त्याचा मृत्यू झाला.

यामुळे सदर शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे. तातडीने अग्निशामक दल पोलीस पथकाला पाचारण करण्यात आले व तसेच त्या ठिकाणी पशुसंगोपन खात्याच्या वैद्यांनीही पाचारण करून पंचनामा केला.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते