खानापूर

मेरड्यात घर कोसळले; सव्वाशे गणेश मूर्ती नष्ट,मदतीचे आवाहन

घर कोसळल्याने गणेश मूर्तीकाराचे मोठे आर्थिक नुकसान; ग्रामस्थांनी केली धावपळ,

खानापूर – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मेरडा येथील गणेश मूर्तीकार तुकाराम परसराम सुतार यांचे घर कोसळले असून, यामध्ये त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी सायंकाळी अचानक त्यांच्या घराची पडझड झाली. तुकाराम सुतार हे गेल्या अनेक वर्षांपासून शेडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे काम करतात. यावर्षीही गणेशोत्सवासाठी त्यांनी शंभर ते सव्वाशे मूर्ती तयार केल्या होत्या. मात्र घर कोसळल्यामुळे या सर्व मूर्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह याच कामावर अवलंबून असल्याने या घटनेमुळे ते मानसिकरीत्या खचून गेले आहेत.

घटनेची माहिती मिळताच खानापूर-बेळगाव युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि कोल्हापूरचे उद्योजक के. के. पाटील (कल्लाप्पा कृष्णाजी पाटील) यांनी सुतार कुटुंबाची भेट घेतली आणि तुकाराम सुतार यांना तातडीची मदत म्हणून 5 हजार रुपयांची मदत केली.

यावेळी हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील मारुती पाटील, सदस्य रणजीत पाटील, पांडुरंग कृष्णाजी पाटील, मेरडा पीकेपीएस उपाध्यक्ष लक्ष्मण दत्ताराम पाटील, करजगीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, कलमेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक लक्ष्मण बाळू पाटील हे उपस्थित होते.

दरम्यान, हलगा ग्रामपंचायतीच्या वतीने अध्यक्ष सुनील पाटील, पंचायत सदस्य पांडुरंग पाटील, ग्रामपंचायत पीडीओ निंगाप्पा अक्षी तसेच हलगा तलाठी यांनीही घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त घराची पाहणी केली. योग्य पंचनामा करून शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य रणजीत पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की, शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करून सुतार कुटुंबाला सावरण्यास मदतीचा हात द्यावा.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या