खानापूर

हलशीचा चोरटा, 5 ठिकाणी चोरी, 21 लाखांचा ऐवज जप्त!

20 तोळे सोनं, चांदीचे दागिने असा 21 लाखांचा ऐवज जप्त : 5  गुन्ह्यांची कबुली

खानापूर: तालुक्यातील हलशी गावचा रहिवासी असलेला महादेव नारायण धामणेकर (वय २६) या सराईत चोरट्याला कित्तूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे २१ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २० तोळे सोनं आणि चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.

महादेव धामणेकर हा व्यवसायाने गवंडी असला तरी गेल्या काही वर्षांपासून तो आंतरराज्य घरफोडी करत होता. तो यापूर्वी कोल्हापूरमध्येही घरफोडीप्रकरणी गुन्हेगारी तपास विभागाच्या जाळ्यात अडकला होता आणि जामिनावर बाहेर आला होता.

हुबळीच्या विद्यानगर भागात १९ मे रोजी कल्लाप्पा शंकयप्पा करविनकोप यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार दिली गेली होती. त्यावरून बेल्होंगलचे डीएसपी वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवानंद गुडगनहट्टी, उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धामणेकरला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने कित्तूर पोलिस ठाणे हद्दीत ३ आणि धारवाड पोलिस ठाणे हद्दीत २ घरफोड्यांची कबुली दिली आहे.

त्याच्याकडून २०० ग्रॅम सोनं आणि २७० ग्रॅम चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले असून त्याच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला हिंडलगा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या