डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? digital arrest

बेळगाव: खानापूर,बीडी गावात, सायबर गुन्हेगारांनी एका वृद्ध दाम्पत्याला ब्लॅकमेल केले. 6 लाख रुपये उकळले आणि अधिक पैशांची मागणी केली. या मानसिक त्रासाला कंटाळून दाम्पत्याने जीवन संपवले.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

सायबर गुन्हेगार खोटे पोलिस बनून कॉल करतात आणि अटक करण्याची, फोटो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देतात. आणि मोठी रक्कम मागतात. 

कसे सावध राहावे?

अनोळखी कॉल्स आणि मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी कॉलरची ओळख तपासा.  सरकारी संस्था - पोलीस फोनवरून दंड किंवा पैसे मागत नाहीत.

असा  फोन आल्यास काय करावे?

फसवणुकीचा संशय आल्यास त्वरित सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधा. तुम्ही राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन नंबर 1930 किंवा सायबर गुन्हे पोर्टलवर (cybercrime.gov.in) तक्रार नोंदवू शकता

समाजाची जबाबदारी

सायबर फसवणुकीबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. वृद्ध आणि तंत्रज्ञानाबद्दल कमी माहिती असलेल्या लोकांना या धोक्यांबद्दल माहिती द्या. समाजाने एकत्र येऊन अशा गुन्हेगारांविरुद्ध लढा दिला पाहिजे.

सर्वांना  नक्की शेअर करा. 

खानापूर तालुक्यातील  युवकाचे यश

पुढील स्टोरी