खानापूर मलप्रभा क्रीडांगणावर आज क्वार्टर फायनलचा थरार
खानापूर: मलप्रभा क्रीडांगणावर सुरू असलेल्या प्रिंट झोन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील क्वार्टर फायनल सामने आज खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा 14 मार्च रोजी होळी निमित्ताने सुरू झाली होती. उद्घाटनप्रसंगी प्रिंट झोनचे मालक विकी फर्नांडिस, स्टीव्हन फर्नांडिस तसेच विविध स्पॉन्सर्स उपस्थित होते.

ही स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. आणि यामध्ये 48 हून अधिक संघांनी भाग घेतला आहे. साखळी फेरीत दमदार कामगिरी करत कॅसलरॉक, लोंढा, तिवोली आणि एआरके हे संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचले आहेत. आज होणाऱ्या सामन्यांमध्ये अजून चार संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहचणार आहेत.

23 मार्च रोजी या स्पर्धेचे सेमी फायनल सामने व भव्य अंतिम सामना खेळवला जाणार असून, हे सर्व सामने Sports onn या YouTube चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींनी या सामन्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला ₹1,11,000 तर उपविजेत्या संघाला ₹55,000 चे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच मालिकावीर आणि सामनावीर यांना विशेष बक्षिसे जसे की सायकल, घड्याळ आणि अन्य आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत.

या रोमांचक स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. अंतिम सामना अधिकच उत्कंठावर्धक ठरणार असून, क्रिकेटप्रेमींनी आपल्या आवडत्या संघांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे

