बातम्या
प्रज्वल रेवण्णांची तुरुंगात रवानगी
बेंगलोर : अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटकेत असलेले जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना आता तुरुंगात पाठवण्यात आले आहे. माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना एसआयटीने अश्लील व्हिडिओ प्रकरणी अटक केली होती. मंगळवारी त्यांच्या एसआयटी कोठडीची मुदत संपल्यानंतर बेंगळुरू येथील 42 व्या एसीएम न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
प्रज्वल रेवन्ना prajwal revanna यांना २४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना मंगळवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.