खानापूर

किरकोळ कारणावरून सुनेने केली सासूवर हल्ला – सासूचा हात कापला

बेळगाव:  जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. वैयक्तिक वाद विकोपाला जात असून गुन्हेगारी घटना वाढत आहेत. गुरुवारी मारीहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक धक्कादायक घटना घडली.

काय घडले?
80 वर्षीय जानव्वा हुदळी या वृद्ध महिलेवर त्यांच्या सुनेने हल्ला केला. किरकोळ कारणावरून झालेल्या या हल्ल्यात जानव्वा गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनबाई शिल्पाचा पतीसोबत वाद झाला होता. यामुळे रागावलेल्या शिल्पाने लाकडी दांडक्याने सासूवर हल्ला केला, असा आरोप जानव्वा यांनी केला आहे.

आरोपी सुनबाई म्हणते…
शिल्पाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू स्पष्ट केली आहे. “मी कामावर गेले होते. सासूबाईंनी स्वतः हाताला दुखापत करून माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी काहीच चुकीचे केले नाही,” असे म्हणत शिल्पाने अश्रू ढाळले.

या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते