1800 किलो अवैध गोमांसाची तस्करी! बेळगांव ते गोवा
अनमोड: मोलेम चेकपोस्टवर पोलिसांनी आज सकाळी मोठी कारवाई करत 1800किलो अवैध गोमांस जप्त केले. हे मांस बेळगावहून बेकायदेशीरपणे वाहतूक केले जात होते, असे समोर आले आहे.
पोलिसांनी तपासणीसाठी वाहन अडवून तपासले असता, त्यात गाय आणि बैलाचे मांस मिसळलेले आढळले. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अशा प्रकारच्या तस्करीवर बंदी असूनही, हे अवैध कृत्य सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले मांस अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्यासाठी धोकादायक स्थितीत होते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने अशा बेकायदेशीर मांस कटिंग आणि तस्करीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. हे मांस दोन दिवसांपूर्वी कापण्यात आल्याचा संशय असून, ते बाजारात विक्रीसाठी पाठवले जात होते, असे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, दोषींवर लवकरच कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.