खानापूर
माचिगड क्रिकेट स्पर्धेत विशेष बक्षिसांचे आकर्षण: मेंढा आणि कोंबड्या पुरस्कारात
खानापूर: तालुक्यातील माचिगड गावातील श्री सुब्रह्मण्य युवक संघाच्या वतीने आयोजित मकर संक्रांती निमित्त आयोजित हाफ-पिच क्रिकेट स्पर्धा खेळाडूंमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ही स्पर्धा 11 जानेवारी 2025 रोजी माचीगड येथे पार पडणार आहे.

स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे बक्षिसांची विशेष रचना. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यास ‘मेंढा’, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यास ‘मेंढा’, तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यास तब्बल 11 कोंबड्या पुरस्कार स्वरूपात दिल्या जाणार आहेत. याशिवाय मालिकावीर बेस्ट खेळाडू यांच्यासाठी कोंबड्या अश्या विशेष बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे भागातील स्पर्धकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार असून, विजेत्या संघांना आकर्षक ट्रॉफी आणि गौरव करण्यात येणार आहे.
