खानापूर
खानापूर येथे डोक्यात लोखंडी रॉड पडल्याने कामगाराचा मृत्यू
खानापूर: केंचापूर गल्ली खानापूर येथील नाना चापगावकर (वय 54) यांच्या डोक्यात लोखंडी रॉड पडल्याने उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 3) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.

घटनेचा तपशील:
गुरुवारी (ता. 2) येथील बहार गल्लीत नंदगडी यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. जेसीबीच्या सहाय्याने लोखंडी रॉड हलवित असताना तो चुकून नाना चापगावकर यांच्या डोक्यावर कोसळला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.
