खानापूर

निडगल गावचा हिंदकेसरी किरण बैल काळाच्या पडद्याआड

खानापूर: बैलगाडा शर्यत क्षेत्रात कर्नाटक व महाराष्ट्र हिंद केसरी पुरस्कृत निडगल गावचा बैल(पाडा) किरण याचे आज रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दुखद निधन झाले. या घटनेमुळे खानापूर तालुक्यातील बैलगाडा  शौकीनांमध्ये शोककळा पसरली आहे.

किरण पाड्याने कमी वयात बैलगाडा क्षेत्रात आपले नाव केले होते तो सर्वांचा आवडता बनला होता. तो अनेक बैलगाडा शर्यतीमध्ये अपराजित होता.

किरण पाड्याचे मालक सुशील कदम यांनी त्याची लहानपणापासून खूप काळजी घेतली होती. त्याच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

किरण बैलाच्या आठवणीने खानापूर तालुक्यातील अनेक बैलगाडा मालक व बैलगाडा शौकीन हळहळ व्यक्त करत आहेत.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते