क्राईम

खानापूर: 15 वर्षाच्या मुलीशी लग्न, मुलाला अटक

खानापुर:  अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याच्या आरोपाखाली पतीला अटक केल्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित अल्पवयीन मुलीची घरातून सुटका करून जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केल्याची माहिती मंगळवारी खानापूर महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तरुण मंजुनाथ (वय 24, रा. हिरेमुनवळी, ता. खानापूर) असे विवाहित तरुणाचे नाव आहे. मंजुनाथचा विवाह 26 मे रोजी शेजारच्या गावातील 15 वर्षे 8 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीशी झाला होता. संबंधित विवाहित मुलगी पतीच्या घरी राहत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी घरी जाऊन मुलीला ताब्यात घेतले. विवाहित मुलगी अल्पवयीन असल्याने याबाबत खानापूर महिला व बालकल्याण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.

त्यानुसार सदरचा तपास करून पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या कुटुंबीयांना बेळगाव जिल्हा बाल संरक्षण कार्यालयात आणले असून पुढील चौकशी सुरू आहे.

marriage with 15 years girl in Khanapur one arrested

child marriage in Khanapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते