खानापूर

चन्नेवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन


चन्नेवाडी ता.खानापूर येथील ग्रामस्थांनी क.नंदगड ग्रामपंचायतीचे विकासाधिकारी श्री.भीमाशंकर यांचेकडे अध्यक्ष,ग्रामविकासाधिकारी यांच्या नावे दोन मागण्यांची दोन निवेदने सादर केली.

पहिल्या निवेदनात गेली काही वर्षे बंद असलेली प्राथमिक शाळा गावकऱ्यांच्या प्रयत्नातून 1 जून पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे, सद्यस्थितीत शाळा व अंगणवाडी एकाच खोलीत भरविली जात आहे, शेजारीच असलेली शाळेची पहिली इमारत धोकादायक बनली असून अर्धवट पडलेल्या अवस्थेत आहे, त्यामुळे शाळेच्या परिसरात खेळणाऱ्या शाळेच्या व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यानसाठी हे जोखमीचे असून ग्रामपंचायतीने ही इमारत जमीनदोस्त करावी, व त्याचे पुननिर्माण करण्यात यावे असे म्हटले आहे.

तर दुसऱ्या निवेदनात गावातील सार्वजनिक ठिकाणी ज्या मोकळ्या जागा आहेत त्या सर्व जागांचे ग्रामपंचायती कडून सर्वेक्षण करण्यात यावे, व मोजमाप करून त्याची नोंद उताऱ्यावर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही निवेदनावर पालकवर्ग व गावकऱ्यांच्या सह्या आहेत.

यावेळी विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील,दिलीप पाटील,मुरलीधर पाटील,धनंजय पाटील,भरमाजी पाटील,सुधाकर पाटील,शंकर पाटील,दत्ताराम पाटील,लक्ष्मण पाटील,उदय पाटील,ईश्वर पाटील,प्रेमानंद पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते