खानापूर

खानापूर नगरपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध निवड, गुलाल उधळून आनंदोत्सव

खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदांच्या निवडीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षा होती. ऑगस्ट महिन्यात या पदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती, ज्यामध्ये दोन्ही पदे सर्वसामान्य महिलांसाठी आरक्षित करण्यात आली होती.

याच दरम्यान, नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित नसल्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. यामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. अखेर, न्यायालयाने निर्णय देत निवडणूक २७ जानेवारी रोजी जाहीर केली.

सोमवारी, २७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी सौ. मिनाक्षी प्रकाश बैलरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, तर उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका जया भुतकी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.

९ नगरसेवकांपैकी एकेकच अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

बिनविरोध निवडणूक जाहीर होताच नगरसेवकांनी गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते