खानापूर

मुंबईतील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत खानापूर कराटेपटुंचा दबदबा

खानापूर: मुंबई येथे विरस्टाईल शोतोकन कराटे फेडरेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत स्वानापूर येथील व्ही.एस.के.एफ कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत खानापूरच्या कराटेपटूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

बलराज कळेकर, संकेत पाटील, नागराज तलवार, प्रितम मादार, नागेश पाटील, संकेत पाटील यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. संकेत पाटील याने सुवर्ण पदक जिंकले. नागराज तलवार, प्रितम मादार यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक जिंकले, तर बलराज कळेकर,नागेश पाटील यांनी कास्यपदक पटकावले.  या सर्व विद्यार्थ्यांच्या कामगिरीमुळे खानापूर तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे.

या विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक राहुल पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनतीमुळे आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीमुळे हे यश शक्य झाले. या यशस्वी कामगिरीबद्दल तालुक्यात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते