खानापूर

हुळंदमध्ये भक्तिरसाचा महाप्रसाद! सातेरी केळबाय देवी उत्सवाचे विशेष आयोजन

हुळंद (ता. खानापूर) – येथील ग्रामदैवत श्री सातेरी केळबाय देवीच्या पाषाण मूर्तीच्या अभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन शनिवार, २२ मार्च २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा:
सकाळी १०.३० वाजता पूजनाच्या विधींना प्रारंभ होईल. दुपारी १.३० ते ४.००, तसेच संध्याकाळी ४.०० ते ६.३० आणि ७.०० ते ९.०० या वेळेत विविध धार्मिक कार्यक्रम होतील. रात्री ९.०० ते ११.०० या वेळेत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुरोहित श्री. प्रयाग विनायक पित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाटा मंदिर येथे श्री सत्यनारायण महापूजा, आरती आणि तिर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाप्रसादाचे वितरण श्री सातेरी केळबाय युवक मंडळ, हुळंद यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात म्हातारीबाय दिंडी पथक चिगुळे व महिला मंडळ, हुळंद यांच्या वतीने पारंपरिक फुगडी, स्थानिक ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन, तसेच बालकांसाठी विशेष मनोरंजनात्मक आणि पावणी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ देखील होणार आहे.

रात्री ठीक १२.०० वाजता श्री माऊली देवी तरुण नाट्य मंडळ, कणकुंबी यांच्यातर्फे प्रा. वसंत कानेटकर लिखित तीन अंकी पौराणिक नाट्यकलाकृती “संगीत मत्स्यगंधा” सादर केली जाणार आहे.

गावातील भाविकांसाठी हा एक सोहळा मोठ्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा असेल. या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ आणि श्री सातेरी केळबाय युवक मंडळ, हुळंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते