खानापूर

खानापूर-हेम्मडगा रोड कधी सुरू होणार? प्रवाशांचे हाल

खानापूर: मणतुर्गा गावाजवळील रेल्वे भुयारी पुलाच्या कामामुळे खानापूर-अनमोड मार्ग दोन महिन्यांपासून बंद आहे. पर्यायी असोगा मार्ग अरुंद, धुळीने भरलेला असून, गावातील गल्ल्यांमधून जावे लागत असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास वाढला आहे.

भुयारी पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, अवघे चार-पाच मजूर काम करत असल्याने आणखी दीड महिना विलंब होणार आहे. बाजूने पर्यायी रस्ता उपलब्ध असूनही मुख्य मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी 25 गावांचे नागरिक वेठीस धरले गेले आहेत.

सकाळ-संध्याकाळी असोगा – मणतुर्गा मार्गावरील तळ्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मणतुर्गा गावाबाहेरून काढलेल्या पर्यायी रस्तावर धुळीचे साम्राज्य रेल्वे अभियंते व कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांना अतिरिक्त अंतर पार करावे लागत आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे

Khanapur-Anmod Road Closure: Commuters Suffer Due to Delay

Khanapur: The construction of an underpass near Manturga has led to the closure of the Khanapur-Anmod road for two months. Although an alternative route via Asoga is available, it is narrow and congested, causing frequent traffic jams.

With only a few workers on-site, the project has been delayed by another 1.5 months, affecting 25 villages. Poor planning and negligence by the contractor and railway authorities have worsened the situation. Citizens demand urgent action to complete the work and reopen the road.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते