खानापूर

फोंड्यात अपघात, खानापूर येथील टेंपो चालकाला अटक

खानापूरवार्ता: फोंडा पोलिसांनी खानापूर येथील टेंपो चालकाला अटक केल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा चालक दुचाकीस्वारांना ठोकरून पळ काढण्याच्या प्रकरणात दोषी आढळला. अपघातात एकजण ठार झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (ता. 16) दयानंदनगर-धारबांदोडा परिसरात घडला होता.

जखमी व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने चुकीच्या दिशेने येत दुचाकीला धडक दिली होती. पोलिसांनी पाच दिवसांपासून वाहनाचा शोध घेतला आणि अखेर मारूती गावडा (52) यांना अटक केली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेंपोला ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरू आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते