विद्यार्थ्यांसाठी शिक्षकच उतरले रस्त्यावर. गुंजी खानापूर बसफेऱ्या वाढवण्याची मागणी
खानापूर: गुंजी ग्रा.पं तसेच शिंदोळी ग्रा.पं.च्या व्याप्तीत येणाऱ्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांचे अपुऱ्या बससेवेमुळे खानापूरला शिक्षणासाठी येणाऱ्या हायस्कूल तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

खानापूरातील बहुतांश कॉलेजची वेळ सकाळचीच असल्याने सकाळी आठ वाजता जटगा ते खानापूर ही बस विद्यार्थ्यांनी गुंजीलाच पूर्णतः भरते त्यामुळे पुढील नायकोल,माणिकवाडी सावरगाळी, शिंदोली,गंगवाळी होणकल या गावातील विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. त्यानंतर त्याना 9:30 वाजता येणाऱ्या करंजाळ खानापूर बसची वाट पहावी लागते.
त्यामुळे करंजाळ बसवर अतिरिक्त ताण बडतो त्याही बसमध्ये सगळ्यांना प्रवेश मिळत नाही. परिणामी या गावातील विद्यार्थ्याचे बस अभावी शैक्षणिक नुकसान होतं आहे.
याची दखल खेळ आज शिंदोळी ग्रा.पं. सदस्य. प्रा. शंकर गावडा व प्रा. महंतेश पाटील यांनी विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी खानापूर बस आगार प्रमुखांना निवेदन देऊन सकाळी 8:30 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता गुंजी ते खानापूर अतिरिक्त बस फेरी वाढवावी अशी मागणी केली. यावेळी आगारप्रमुखांनी बस सुरू करण्याची ग्वाही दिली.
निवेदन देताना प्रा. शंकर गावडा, प्रा. महंतेश पाटील, विद्यार्थी गोपाळ पाटील, गणेश चौडी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Teachers took to the initiative for the students. Demand for extension of Gunji Khanapur bus trips
khanapur madigunji bus
khanapur gunji train
khanapur taluka news
#gunji #khanapur