खानापूर
मलप्रभा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सतर्कतेचा इशारा
खानापूर: तालुक्यात आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील सर्व नद्यांना पुर आला आहे. सकल भागात असणारी सर्व पूले पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.


सध्या 27 जुलै 9.30 वाजता मलप्रभा नदीचे पाणी सर्व पायऱ्या पार करून नदीकाठी असलेल्या इस्कॉन मंदिर जवळ येऊन पोहोचले आहे. यामुळे नदीकाठच्या वसाहतीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काल दुपार नंतर पावसाचा जोर वाढल्याने आंबोळी निलावडे भागातील पुलांवर पाणी आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
सतत सुरू आलेल्या पावसामुळे गेल्या 8 दिवसांपासून मणतुर्गा पुल पाण्याखाली आहे. तसेच लोंढा भागातील सर्व पुले पाण्याखाली गेली आहेत.
