मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हेमंत निंबाळकर यांना मुख्यमंत्री पदक प्रदान
बेंगलोर: कर्नाटक राज्याच्या गुप्तचर विभागाचे महासंचालक हेमंत निंबाळकर यांना नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते कर्नाटक पोलीस ध्वज दिन सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

हेमंत निंबाळकर यांनी राज्य आणि शेजारील राज्यांमध्ये नक्षलवाद निर्मूलनासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी पूर्वी बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणूनही सेवा बजावली आहेत तसेच ते खानापुरच्या माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांचे पती असल्याने हा सन्मान खानापूरकरांसाठी बेळगावकर अभिमानाची बाब आहे.

खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले, “हेमंत निंबाळकर यांनी कर्नाटकमधून नक्षलवाद संपवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांना मुख्यमंत्री पदक मिळाल्याचा मला अभिमान वाटतो.”