खानापूर
बारावीचा निकाल जाहीर, उडुपी जिल्हा अव्वल
खानापुर: 2025 शैक्षणिक वर्षासाठीचा द्वितीय पीयूसी (बारावी) निकाल आज, मंगळवारी जाहीर करण्यात आला असून यंदा एकूण 73.45 टक्के निकाल लागला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी बेंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली.

यंदा उडुपी जिल्ह्याने 93.90 टक्के निकालासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर दक्षिण कन्नड जिल्हा 93.70 टक्के निकालासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. दुसरीकडे यादगीर जिल्ह्याने फक्त 48.45 टक्के निकालासह तळाचे स्थान मिळवले.
शाखेनिहाय टॉपर विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत :
- विज्ञान शाखेत – अमुल्य कामत हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ती दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एक्सपर्ट पीयू कॉलेजची विद्यार्थिनी आहे.
- कला शाखेत – संजनाबाई हिने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
- वाणिज्य शाखेत – मंगळूर येथील कॅनरा महाविद्यालयाच्या दीपश्री हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल karresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.