खानापूर

बैलजोड्यांची रंगली चुरस; कांजळे शर्यतीचा अंतिम थरार उद्या | ಯಾವ ಎತ್ತಿನಜೋಡಿ ಗೆಲ್ಲಲಿದೆ? ಕಾಂಜಳೆ ಶರ್ಯತ್ತಿನ ಅಂತಿಮ ದಿನ ನಾಳೆ

16 क्रमांकांसाठी तब्बल 1 लाख 83 हजारांची बक्षिसे; बैलजोडी मालकांमध्ये चुरस

खानापूर : तालुक्यातील मौजे कांजळे येथे श्री रामलिंग देव ट्रस्ट शर्यत समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार सध्या रंगला असून, उद्या मंगळवार, दि. 29 सप्टेंबर रोजी शर्यतीचा अंतिम दिवस असणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीतील विजयी बैलजोडी कोणती ठरणार, याकडे बैलगाडी शर्यतप्रेमींचे लक्ष लागले आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीला बैलगाडी मालक व शर्यतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कांजळे येथे सुरू असलेल्या या शर्यतीत विविध भागांतील बैलजोडी सहभागी होत असून, प्रत्येक फेरीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे.

उद्या होणाऱ्या अंतिम दिवशी शर्यतीचा थरार आणखी वाढणार असून, अंतिम विजेत्या बैलजोडीला प्रथम क्रमांकाचे 25 हजारांचे बक्षीस मिळणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकासाठी ₹२२ हजार, तिसऱ्यासाठी ₹२० हजार, चौथ्यासाठी ₹१८ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ₹१६ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

याशिवाय सहाव्या ते सोळाव्या क्रमांकापर्यंतही रोख बक्षिसे देण्यात येणार असून, एकूण १६ क्रमांकांसाठी तब्बल ₹१ लाख ८३ हजारांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

उद्या अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या शर्यतीत अनेक बैलजोडींनी आपली ताकद आणि वेग दाखवला आहे. आता अंतिम दिवशी कोणती बैलजोडी बाजी मारणार आणि कोणाच्या नावावर विजेतेपदाची नोंद होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

उद्या सकाळपासून कांजळे येथे बैलगाडी शर्यतीचा अंतिम थरार रंगणार असून, शर्यतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री रामलिंग देव ट्रस्ट शर्यत समिती, कांजळे यांच्याकडून करण्यात आले आहे.

स्थळ : कांजळे, ता. खानापूर, जि. बेळगाव
अंतिम दिवस : मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६
संपर्क : 8431851440, 9964224516, 9483179277, 7026380457

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या