खानापूर
खानापूरच्या भाविकाची सोनसाखळी चोरी; चोराला रंगेहाथ पकडून धुलाई

कोल्हापूर: येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत खानापूर तालुक्यातून जत्रेसाठी गेलेल्या लक्ष्मण पंडित खन्नूकर (रा. नागुर्डा) या भाविकाच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रकार घडला.
चोरी करत असताना सतीश पिराजी मासाळकर (रा. नामनगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर) या आरोपीस भाविक लक्ष्मण कटके यांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर जमलेल्या भाविकांनी चोराला चांगलाच चोप दिला आणि लगेच पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी तत्परता दाखवत चोरास अटक केली आहे. कोडोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.