बातम्या

हेमंत निंबाळकर यांची माहिती विभागाच्या आयुक्तपदी बदली

Bengaluru: कर्नाटक सरकारने अतिरिक्त पोलिस महासंचालक हेमंत निंबाळकर Hemant Nimbalkar यांची माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्याचा आदेश काढला आहे.

दरम्यान, यापूर्वी माहिती आणि जनसंपर्क विभागाचे आयुक्त पद भूषविणारे सुरळकर विकास किशोर यांची बृहत बेंगळुरू महानगर पालिकेच्या (बीबीएमपी) विशेष आयुक्त (आरोग्य) या पदावर बदली करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या कालावधीत राज्यातील विविध पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी बदल्या करण्यात आल्या होत्या तशी राज्याची माहिती अधिकारी असलेले हेमंत निंबाळकर यांचीही या जागेवरून बदली झाली होती सध्या त्या पदावर असलेले  आयएएस अधिकारी सुरल्लर विकास किशोर यांची बंगळुरू बीबीएमपीच्या विशेष आयुक्त (आरोग्य) पदावर बदली करण्यात आली आहे.

यापूर्वी हेमंत निंबाळकर हे माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त होते. आत्ता परत सरकारने त्यांना आपल्या पदाचा अधिकार देण्यात आला निंबाळकर सरांनी आपल्या पदाचा अधिकार स्वीकारताच या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Hemant Nimbalkar as Commissioner of Information Department

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते